Saturday, October 20, 2007

पोरखेळ

‘Child's Play Is Serious Business’ ह्या उक्तीवर आधारित…
Anita Wadley ह्यांच्या ‘Just Playing’ कवितेवरून स्वैर अनुवादित…
-----------------------------------------------------------------
रचत असेन कधी, ठोकळे एकमेकांवर
वाटत असेल अगदी, पोरखेळ हा तर !
शिकतो आहे मी, ‘भार’ आणि ‘तोल’
असेनही उद्या मी, 'आर्किटेक्ट' अनमोल.... १

हाती माझ्या बाहुली नि भातुकलीचा खेळ
नजर म्हणे तुमची, “आता आवरताना वेळ “ !
‘जपणं’ नि ’सांभाळणं’, शिकवतो हा खेळ
बनू उद्या ‘आई’/‘बाप’ आम्हीही एखादवेळ.... २

हातांवरती रंग, कधी चिखलातले कुंभार
वाटती तुम्हाला, पोरखेळ हे भंगार !
‘सांगणं मनातलं’ शिकवती ना खेळ
'कलाकार’ उद्या मी, होईन एखादवेळ.... ३

श्रोते नाहीत कुणी, पण ‘वाचनाला’ चढता रंग
तुम्ही म्हणता आहे मी, पोरखेळात पुरता दंग !
‘समजणं’ नि ‘समजावणं’, शिकवत असतो खेळ
असेनही उद्या मी, चांगला ‘शिक्षक’ एखादवेळ.... ४

फिरेन कधी झुडपांतून, खिशांत असे सटरफटर
नक्की वाटेल तुम्हाला, फालतू वाया गेले पोर !
माहीत नाही अजून जे, ते कदाचित शोधे खेळ
तुम्ही म्हणाल मला मग, 'संशोधक’ एखादवेळ...५

भान माझं हरपून जाता, सोडवण्या एखादं कोडं
म्हणू नका हं प्लीज आता, "काहीतरी करतं येडं" !
नुसता खेळण्यात नाही हो मी, वाया घालवत वेळ
सोडवताना प्रश्न उभारेन, 'उद्योग'ही एखादवेळ...६

भांडीकुंडी खुडबुडेन, मिटक्या मारेन थोडावेळ
तुम्हास नक्की वाटेल मग, भलतेसलते माझे थेर !
चवींमधले वेगवेगळे, फरक शिकवति सारे खेळ
चाखत असता आंबट-गोड, ‘बल्लव’ होईन एखादवेळ…७

उड्या मारतो दोरीवर की, वारा धावत असेन चपळ
तुमचं आपलं टुमणं की, ”देवासारखा बस अंमळ”!
शिकतो आहे ‘शरीर’ आणि, हालचालींचा मेळ
डॉक्टर, नर्स वा बहुधा, ऍथलीट होईन एखादवेळ...८

“काय केले शाळेत आज ? कसे होते दिवसाचे स्वरूप?”
"फार काही केले नाही पण, खेळलो मात्र सगळे खूप"!
रागवून आता म्हणू नका हं, “तुझे फालतू नसते खेळ" !
‘माझे’ पेक्षा चांगलं ‘आपले’, शिकायची ही असते वेळ...९

राहू द्याल ’आज’ मला जर, स्वच्छंदी नि आनंदी
पाहू याल मला ’उद्या’ तर, यश ठेवेन पायाशी
लहान आहे मी अजूनि, थांबा ना हो थोडावेळ
कामात आहे मी गढुनि, तुम्हा दिसतो पोरखेळ !!!... १०
--------------------------------------------------------------------

‘Just Playing’ ही कविता हातात आल्यापासून तीन-चार दिवस वाटत राहिलं की ह्या कवितेला मराठी रूप द्यावं। अनुवाद करताना मी थोडं स्वातंत्र्य घेतलंय. जर काही त्रुटी राहिली असेल तर ती माझ्यामुळं पण मनाला जे भावेल त्याचं श्रेय मात्र मूळ कवयित्रीचं. Google वर ’ Just Playing’ किंवा ’ Anita Wadley’ शोधलं तर मूळ कविता मिळेल.

इथे मी काही ब्लॉगयात्रींनाही टॅग करतोय.

---------------------------------------------------------------

11 comments:

Nandan said...

bapre, awaghad tag aahe. specially tuza bhashantar evadha chokh jamala asatana. prayatn karato :)

Tejoo Kiran said...

Very Nice. I liked your expressions in translation , to make it more "MhArathi Kavita". Enjoyed a lot.

-tejoo.

Kamini Phadnis Kembhavi said...

सुंदर अनुवाद, मुळ कविताही आवड्ली,
पण हे टॅग प्रकरण काय आहे ते कळलं नाही :-(

Dhananjay said...

hey, good poem and good translation!

संदीप चित्रे said...

Thanks Dhananjay. What's your email address? I will not publish it :)

संदीप चित्रे said...

Shyamalee,
Thanks for the compliments. Please check Nanand's blog to know more about tagging.

Anonymous said...

khup surekh anuvaad

संदीप चित्रे said...

dhanyawaad kshipra :)

पूनम छत्रे said...

kharach, anuvadit vaaTaNaar naahI, itakaa surekh anuvaad jamalaa aahe. god ahe kavita. :)

Anand said...

मस्त रे संदीप. अनुवादाचं मर्म (जे तुला अगदी बिनचूक जमलंय) हेच असतं की अनुवाद असल्याचं जाणवू नये. शब्दश: अनुवाद ते कधीच साध्य करू शकणार नाही.

तुझा ब्लॉग वाचून (कविता, अमिताभ, सु-शि, कपिल) मला अगदी जुना अन जवळचा मित्र भेटल्यासारखं वाटलं.

वेळ मिळाला तर माझा मराठी audio books चा ब्लॉग जरूर पहा: boltipustake.blogspot.com.

आनंद वर्तक.

Anand said...

संदीप, आत्ताच मूळ कविता वाचली, आणि आईशप्पथ सांगतो, तुझ्या अनुवादाच्या पासंगालाही पुरत नाही रे ती! अर्थात मूळ कल्पना ती मूळ कल्पना, तिला श्रेय दिलंच पाहिजे, पण तू जो तिच्यावर शब्दांचा साज चढवलास तो अनिता बाईंना नाही जमला.

आनंद वर्तक.