Saturday, October 13, 2007

‘दरबारी’ दिमाख

“अलबेला सजन आयो रे...अलबेला …” ।

बासरी आणि सारंगी पाठोपाठ, पायांना ठेका धरायला लावणाऱ्या, तबला, ड्रम्समधून स्वरमंडल नाssजूकपणे झंकारलं आणि अचानक हे गाणं सुरु झालं. मी सिनेमा बघताना खुर्चीत सावरून बसलो. ध्यानीमनी नसताना एकदम ‘अहिर भैरव’ रागातली बंदिश? रूबाबदार विक्रम गोखलेसाठी उस्ताद सुलतान खॉंचा भरदार आवाज कस्सला मस्त आहे. १९९९ सालच्या कमर्शियल हिंदी सिनेमात शास्त्रीय संगीतानं बांधलेलं गाणं? Music director ची तब्येत बरी आहे ना? नक्की कोणाय music director? नेहमीचा वाटत नाही. हिंदी सिनेमावाल्यांच्या भाषेत सांगायचं तर ‘जरा हटके…’ दिसतोय. एकापाठोपाठ एक अनेक विचार डोक्यात आले. दुसऱ्या दिवशी लगेच सिनेमाच्या गाण्यांची ध्वनिफीत (मराठीत ‘audio cassette’ हो !!) विकत घेतली. गाडीत दीपा आणि मी ती गाणी ऐकत होतोच पण शिशिर-प्रज्ञाच्या घरी पोहोचल्यावर त्यांनाही लगेच ‘अलबेला सजन..’ ऐकवलं होतं. तुम्हाला गाणं इथे बघायचंय?

‘इस्माइल दरबार’ ह्या नावाशी पहिली ओळख अशी झाली होती. जरा google केल्यावर समजलं की हा माणूस सूरतहून मुंबईत आला, शास्त्रीय संगीताचं रीतसर शिक्षण घेतलं आहे, संजय लीला भन्साळीच्याच “खामोशी: द म्युझिकल” मध्ये त्यानं व्हायोलिन उत्तम वाजवलंय वगैरे, वगैरे. ‘हम दिल दे चुके सनम’च्या यशात संजय लीला भन्साळीचं दिग्दर्शन, ‘देखणी’ ऐश्वर्या (‘द्विरूक्ती’ झाली, माहित्येय ओs !!), नितीन देसाईचं रंगबहार कला दिग्दर्शन आणि त्या रंगांची उधळण अचूक टिपणारा अनिल मेहतांचा कॅमेरा, ह्याबरोबर इस्माइल दरबारच्या संगीताचा खूपच मोठा वाटा आहे.

‘ऑंखो की गुस्ताखियॉं…’ हे प्रणयतारा अलगद छेडणारं गाणं असो किंवा ‘तडप तडप…’ सारखं विरह गीत, ‘निंबूडा, निंबूडा..’ हे खट्टं-मीठं गाणं असो किंवा ‘हे ss हे हेss, हेss हेss हेहेss’ अशी नुसती सुरावट, प्रत्येक भाव संगीतात न्हाऊन निघाला आहे. ‘झोंका हवा का…’ मध्ये हळूवार फुंकीनं बासरीचा काय अप्रतिम वापर केलाय?!! हॉस्पिटलमधे जायबंदी हाताने कुंकू लावायला धडपडणाऱ्या ऐश्वर्याला, अजय देवगण ते लावताना, पार्श्वसंगीतात “तदेव लग्नं सुदिनं तदैव, ताराबलं चंद्रबलं तदैव..…शुभमंगल सावधान” ह्या मंगलाष्टकाच्या ओळी गाण्याला वेगळीच उंची देतात.

‘हम दिल दे चुके…’ गाणं तर आठवतंय? लाल साडी, मॅचिंग बांगड्या, कपाळावर लालचुटूक कुंकू, उजव्या खांद्यावर काळा-लाल रंगसंगतीची शाल आणि रेशमी केसांचा, मानेवर रूळता, सैल अंबाडा अशी सोज्वळ सजलेली, दरवाजा उघडून येणारी, अधोवदना ‘मूर्तिमंत नजाकत’ ऐश्वर्या (पुन्हा ‘द्विरूक्ती’..काय करणार ओ!!). हे सगळं सौंदर्य perfectly खुलवणारं संगीत. सिनेमाच्या फ्रेम्स जितक्या नेत्रसुखद तितकंच संगीत कर्णमधुर !!! गाणं बघायचा मोह होतोय? फक्त click करा.

‘हम दिल दे चुके..’ नंतर इस्माइल दरबार पुन्हा SLB बरोबर ‘देवदास’ करणार असं कळलं आणि पाठोपाठ समजलं ऐश्वर्या, माधुरी एका गाण्यात एकत्र दिसणार आहेत. मन आंनदानं ‘नाचू नाचू’ का काय म्हणतात ते झालं !! हे म्हणजे job offer देताना, “भरपूर पगार मिळेल पण घरून काम करण्याची सोय, भरघोस बोनस आणि वर्षाला ६ आठवड्यांची सुट्टी मान्य असेल तरच..!” असं आपल्याला खड्डूस HR नं सांगण्यासारखं आहे. (कृपया लगेच दिवास्वप्ने पहाण्याची चूक करू नये. खड्डूस HR असं विरघळत नसतं.)

‘सिलसिला ये चाहत का..’ गाण्यातून इस्माइल दरबारनं पार्श्वगायनातलं एक अनमोल रत्न आपल्याला भेट केलं – ‘श्रेया घोशाल’. नुसता नाजूकच नाही पण काय फिरणारा आवाज आहे तिचा ! ‘बैरी पिया…’ गाण्यातलं श्रेयाचं गोड ‘इश्शss..’ !!! संगीत दिग्दर्शकाकडे असं हटकेपण ‘वरूनच’ यावं लागतं.

‘डोला रे डोला..’ म्हणजे तर audio visual treat आहे. अनुपम सौंदर्याच्या दोन प्रतिमा ! दोघीही शास्त्रीय नृत्य शिकलेल्या आणि त्यांच्या play back singers तितक्याच कसलेल्या. बघायचंय?

अपेक्षेप्रमाणे एक से बढकर एक गाणी आणि ‘ह्या’ लावण्यवतींनीच ‘देवदास’ला सांभाळलं. पण, दोघींत आपलं माप अजूनही माधुरीकडेच झुकतं हां ! आठवा ‘काहे छेड, छेड मोहे..’ आणि ‘मार डाला..’ ह्या गाण्यांतली माधुरी. (पुन्हा मोह होतोय?... ‘काहे छेड..’ आणि ’मार डाला..’ !!) Btw, ‘उमराव जान’ आणि ‘मुकद्दर का सिकंदर’च्या रेखानंतर एकदम माधुरीची ‘चंद्रमुखी’ !!! तिच्याइतकं मोहक आणि graceful दुसरं कोणी आहे? ‘मार डाला…’ संपताना देवदास आणि चंद्रमुखी दोघांच्याही, आपापल्या, वेदना अधोरेखित करणारे सनईचे सूर !

‘अलबेला सजन..’ मधे उ. सुलतान खॉं होते तर ‘काहे छेड..’ साठी साक्षात पं. बिरजू महाराज !!! बिरजू महाराजांनी गाणं लिहिलंय, compose केलंय आणि थोडं गायलंही आहे. पंडितजींच्या जोडीनं कविता सुब्रम्हण्यम (आपली कविता कृष्णमूर्ती हो ss !!) आणि माधुरीनं गाणं मस्त खुलवलंय !

नुकताच Zee TV वर ‘सारेगमप’ चा एक भाग पाहिला. पकिस्तानच्या ‘अमानत अली’ ह्या हिऱ्याला ‘दरबार’ पैलू पाडतोय. अमानतच्या आवाजाची ‘फिरत’ दाखवण्यासाठी दरबारनं ‘अलबेला सजन…’ मुद्दाम थोडं अजून वेगळं बांधलं. गुरू-शिष्यानं मिळून काय ‘माहौल’ केलाय म्हणून सांगू !! (मोहात पडलेला सावरणं अवघड असतं महाराजा…’ ! थोडं distorted recording आहे पण ती ५ मिनिटे इथे आहेत ना! पं. जसराज, जगजीत सिंग ते हिमेश रेशमिया, सगळ्यांच्या प्रतिक्रिया नक्की पहा.)

‘ताल’ हे इस्माइल दरबारच्या संगीताचं खूप मोठं शक्तिस्थान आहे. Electronic drums सगळेच वापरतात पण ‘तबला’ अतिशय प्रभावीपणे वापरून घेण्यात, आजच्या संगीतकारांमधे, इस्माइल दरबार खूप पुढे आहे. जवळपास अडीच वर्षांचा आदित्य गाडीत बसल्यावर मधेच कधीतरी, Disney किंवा Barney ऐकण्यापेक्षा, जेव्हा म्हणतो, “बाबा ! धिन..धान..धा”, तेव्हा समजायचं त्याला “काहे छेड..” किंवा ‘अलबेला सजन..” ऐकायचंय. लहान मुलापासून ते संगीताच्या दिग्गज जाणकारापर्यंत सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारी गाणी ऐकल्यावर मनात येतं, “हे येरा-गबाळ्याचं काम नोहे; हा दिमाख ‘दरबारी’ आहे” !!!

20 comments:

Dhananjay said...

Good article!

संदीप चित्रे said...

Thanks Dhananjay.

पूनम छत्रे said...

kharay, ismail darbar talented ahe, paN titkach saNakI pan vatato :)

aso, maza blog bagh please. tula eka upakramat sahabhagi karoon ghetala ahe :)

Tejoo Kiran said...

Beautifull !!! It's like someone giving words to my own thoughts !!! Looking forward to next one.

-Tejoo.

Anonymous said...

Mast aahe!!!!!!!!

Very good observation.

संदीप चित्रे said...

Thanks 'anonymous'

May I know who liked the article? :)

Cheers,
Sandeep

Anonymous said...

Sandeep
You can write very good critique's ..
Nice layout , nicely supported
with song list .. And GOOD Marathi.
Much Better Marathi than leading marathi newspapers.
I totally agree with you about "Dola Re Dola".
Hemant Kulkarni

Parag P said...

Likhanachi style thet abhijit desai,shirish kanekar ani dwarkanath sanjhgiri chya valnachi ahe ho....:-)

संदीप चित्रे said...

You said it right Parag; Just add Suhas Shirvalkar to it please :)

संदीप चित्रे said...

Hemant,
Thanks for the compliments, especially on my Marathi :)
Cheers.

मिलिंद छत्रे said...

छान लिहीलेय संदीप.
तडप तडप माझे खूप आव्डते गाणे आहे...
जुन्या आठवणी जाग्या झाल्या...

BTW
माझा ब्लॉग वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप आभार...

Monsieur K said...

Sandeep,
this is a very nice & informative write-up.
chhaan vaatla vaachun.

~Ketan

Kamini Phadnis Kembhavi said...

आवडता विषय अर्थात गाणं आणि त्याबद्दल एवढ विस्तृत लिखाणं, त्यात परत पहिल्यांदा वाचायला घेतलं ते 'अलबेला सजन.........'
वेळोवेळी दिलेल्या लिंक्सनी जास्त मजा आली वाचताना

भरपुर लिहा,
शुभेच्छा

Anonymous said...

Masta! Albela Sajan aiklyavar me pan agdi haach vichar kela...Aheer Bhairav madli bandish, Ustaad Sultan Khan yancha awajat ani he sarva eka hindi cinema madhe!
Hum Dil madhli saglich gaani chhan aahet yat vaad-ch nahiye!

Anonymous said...

Masta! Albela Sajan aiklyavar me pan agdi haach vichar kela...Aheer Bhairav madli bandish, Ustaad Sultan Khan yancha awajat ani he sarva eka hindi cinema madhe!
Hum Dil madhli saglich gaani chhan aahet yat vaad-ch nahiye!

संदीप चित्रे said...

Thanks Chandana. So we thought alike :)

यशोधरा said...

संदीप, तुमच्या अनुदिनीची लिंक दिल्याबद्दल आभार :)
दरबारी दिमाख आवडल. छानच जमलय लिखाण. इस्माईल दरबारचे संगीत मलाही आवडते. पुढच्या लिखाणाला खूप शुभेच्छा :)

यशोधरा said...

संदीप, तुमच्या अनुदिनीची लिंक दिल्याबद्दल आभार :)
दरबारी दिमाख आवडल. छानच जमलय लिखाण. इस्माईल दरबारचे संगीत मलाही आवडते. पुढच्या लिखाणाला खूप शुभेच्छा :)

Anonymous said...

संदीप,
" अलबेला सजन ... "ची एक आठवण आहे, आता लेख वाचताना प्रकर्षाने आठवली.

गेल्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीत एका Campला गेले होते,
it was organised bye लोकसत्ता.
inaugarationlaa पं. अजय पोहनकर आणि त्यांच कुटुंब आलं होतं.
मग but naturally, शास्त्रिय संगीतावर थोडं बोलणं झालचं.
तेव्हा अजयजींनी एक आठवण बोलता - बोलता आम्हाला सांगितली होती...
in fact ऐकवली... आणि आम्ही सगळेच थक्क.

त्यांनी आम्हाला " अलबेला सजन... "च्या काही ओळी ऐकवल्या.
it was mind blowing experience..

" अलबेला सजन ... " Original Composition पोहनकरांच आहे..
त्या "दरबार" ने त्यांच्याकडून गाऊन पण घेतल.
आणि next day त्याच recording उ. सुलतान खॉं कडून केल.

---------------------------------
काथ्या- कूट खुप झाला.
direct सांगते तु छान लिहिल आहेस.

- वर्षा ऋतू

संदीप चित्रे said...

Varsha Rutu,
Thanks for the information. I did not know it :)
Sandeep