Saturday, April 21, 2012

पत्रातला मजकूर!


तुझ्या नेत्री विखारच जर प्रिये सामावला होता

तुझ्या पत्रातला मजकूर का ओलावला होता?.... १पहाटे जाग येते ही तुझी सय, अन्य ना काही

मला झुरता बघूनी चंद्रही रोडावला होता.... २खिसेकापू इथे धन्वंतरी झाले पहा आता!

"जपुन देहास ठेवा", मंत्र मजला गावला होता.... ३तिच्या केसांत माझे श्वास गुंतावे म्हणूनी का

तिचा गजरा फिरूनी एकदा सैलावला होता?.... ४सुरेच्या वर्णनाने आज गझलेला नशा आली

तिचा प्रत्येक मिसरा वाटते धुंदावला होता... ५

No comments: