Wednesday, September 30, 2009

सुहाग भैरव

पहाटवेळी उधळत टापा
अश्व दौडले आदित्याचे
घेऊन येता आशीष शिवाचे
पडले भूमीवर कण बर्फाचे …

संध्या होती लालीमेची
चंद्रसख्यांनी रात्र सजवली
दारी उषेच्या वरात घेऊनी
लगीनघाई रविकिरणांची …

देवतांस गेली आमंत्रणे
कुबेर सजवी नजराणे
पळती विघ्ने रूप पाहूनी
मूषकावर गजाननाचे …

नारद – तुंबर करती गायन
भरला दिशांत मुरलीचा रव
घटिका बुडे वेदमंत्रातून
पक्षी गुंजती सुहाग भैरव …

4 comments:

प्रशांत said...

छान कविता.
दोन-तीन ओळींमध्ये मात्रा कमी-जास्त झाल्या आहेत.. (चु.भू.द्या.घ्या.)

क्रांति said...

surekh pahaat! suhag bhairav he sheershak khoop aavadal.

संदीप चित्रे said...

प्रशांत, क्रान्ति
धन्यवाद !

क्रान्ति,
बऱ्याच वर्षांपूर्वी एका पहाटे उ. अमजद अली खाँ यांनी ’सवाई गंधर्व संगीत महोत्सवात’ सुहाग भैरव वाजवला होता. या नावाचे श्रेय त्यांचे आहे !

Anonymous said...

mala lagna barphamule New Jersey la ahe ase vatle. Very good