Sunday, March 15, 2009

ग्लोबल वॉर्मिंग (देवद्वार छंद)

पाहता पाहता
काळ दारी आला
सारी वसुंधरा
संकटात….१

ऊतले मातले
गर्वात नाचले
बेफाम वागले
सान थोर….२

वाहनांची रीघ
जणू पाठशिव
हवेचाच जीव
घुसमटे….३

यंत्रांचा निघाला
धूर काळा काळा
प्लॅस्टिकचा मळा
त्यात फुले….४

विज्ञानाने केली
आपली प्रगती
आणि अधोगती
आपणच….५

पाहू एक स्वप्न
करूया प्रयत्न
जपूया हे रत्न
पृथ्वी नामे….६

कापडी पिशवी
प्लॅस्टिक ऐवजी
जमे ही सहजी
सुरूवात….७

मोटार गाडीला
ठेवुनी बाजूला
पायी पायी चला
शक्य तेव्हा….८

लावू झाडे, वृक्ष
माळरानी रूक्ष
मुलांचे भविष्य
तगवाया…. ९

5 comments:

Nikhil said...

Saglyach ovya paristhithichi janiv karun detat...5 ani 8 ovya chhan uttam...

प्रशांत गिजरे said...

मस्तच रे...

वाहनांची रीघ
जणू पाठशिव
हवेचाच जीव
घुसमटे….३

हे फारच सुंदर .... तसेच धूर काळा आणि प्लॅस्टिकचा मळा पण झकासच.. विचार करायला लावणारी कविता आहे. अतिशय थोडक्यात पूर्ण विचार पोचवणारी कविता वाटली मला.

supriya said...

pharach sunder.....
sagalya goshti khup yogya shabdat varnan kelya aahes....

wolftank said...

Amazing...

Tejoo said...

Khupach mast. Agadi patanyasarakhe sagale aahe. mandale ahes suddha khupach thodkyat and sundar. To the point...aavadalee....