Saturday, November 3, 2007

दुनियादारी

“तू गपे xxxच्या ! अजून दुनियादारी वाचलं नाहीयेस आणि म्हणे माझं लग्नं करा !”

हे ठेवणीतलं वाक्य यायचं आलं की वाक्याचा ‘घेता’ (recipient साठी दुसरा चांगला शब्द माहिती आहे?) आपोआप गप्प व्हायचा. बरोबर आहे, वर्मावर का कुठे म्हणतात तिथे बोट ठेवलं जायचं. आपण सुहास शिरवळकरांची जवळपास सगळी पुस्तकं पारायणं करून वाचली पण अजून मास्टर पीस वाचला नाहीये ! मारे ढीगभर हिंदी सिनेमा पाहिले पण ‘शोले नाही पाहिला अजून? ‘दुनियादारी’ नेमकं आत्ताच out of print? हॅत्त तेरी तर !!!

एक दिवस अचानक मिळालं. हुर्रे !!! जिओ यार…पुणे नगर वाचनालय जिंदाबाद !! एक दिवसात परत करायच्या बोलीवर मित्राकडून कसंबसं मिळालं. पुस्तक नुसतं हाताळतानाही थरारलो. रात्रीचा दिवस करून वाचलं आणि एका रात्रीत खूप काही बदललं. मागे एकदा किमी काटकरची मुलाखत वाचली होती. (बरोबर आहे, तीच किमी ! हिंदी “टारझन” सिनेमात जिच्यापेक्षा टारझनच्या अंगावर जास्त कपडे होते ना ती !) ती म्हणाली होती की ‘हम’ सिनेमात अमिताभची हिरॉइन झाल्यावर लोक तिला ‘किमी’ ऐवजी ‘किमीजी’ म्हणू लागले. तसं, ‘दुनियादारी’ वाचल्यावर, “गपे xxxच्या ! अजून दुनियादारी…..” हा डायलॉग म्हणायचा अधिकार मिळाला. आता ‘दुनियादारी’ची स्टोरी वगैरे सांगत नाही कारण तो ह्या लेखाचा उद्देशच नाही. ‘चिकन सूप’ चाखून ताटातल्या झणझणीत रश्याची नक्की चव नाही कळत !

कॉलेजच्या वयातच दुनियादारी वाचायला मिळणं फार आवश्यक असतं. खरं तर प्रत्येकानं college मधे असताना दुनियादारी वाचायलाच हवं. शिरवळकरांनी एक-एक पात्र काय अप्रतिम रेखलं आहे. College life मधली सळसळ म्हणजे दुनियादारी ! रोमँटिक तरूणाईची दुनियादारी ! भग्न प्रेम म्हणजे दुनियादारी ! अस्सल शिव्या, मारामारीची दुनियादारी ! वास्तवाचं भान देणारी दुनियादारी ! ह्या सगळ्यापेक्षा दशांगुळं वर म्हणजे कोवळ्या वयात चुका होऊ न देणारी दुनियादारी !!!

कॉलेजच्या भाषेचा एक छान लहेजा कादंबरीला आहे, योग्य तिथे आणि योग्य त्या शब्दांसकट !! दुर्दैवानं आता सुहास शिरवळकर आपल्यात नाहीत पण त्यांचा वाचक-चाहता म्हणून मी अकरावीत असताना त्यांना पाठवलेल्या पहिल्याच पत्राच्या उत्तरात त्यांचं वाक्य होतं ,”दुनियादारी मात्र जरूर वाच.” त्यानंतर वयाचं अंतर पार करून, त्यांच्याशी छान स्नेह जुळला होता. मला आठवतंय एकदा त्यांच्या घरीच त्यांना विचारलं होतं की ‘दुनियादारी’त इतक्या सहजपणे शिव्या वगैरे का? ते म्हणाले होते, “एक तर कॉलेजमधली तुझ्याच आसपासची भाषा बघ, तुला वाक्यांगणिक सहज शिव्या सापडतील. दुसरं म्हणजे मारामारीचा वगैरे प्रसंग वाचताना,” अरे नालायका, मूर्खा ! थांब जरा तुझ्याकडे बघून घेईन” कसं वाटेल? तिथे शिव्यांशिवाय intensity येणारच नाही !! तसंच कॉलेजची पोरं, “काय वेडा किंवा काय बावळट आहेस का तू?” वगैरे म्हणतात का? नाही! सरळ “काय xx झाला काय?”, असंच म्हणतात ना?” येस बॉस, मानलं !

‘दुनियादारी’मधे श्रेयस तळवळकर मुख्य पात्र आहे पण ‘धासू रोल’ म्हणजे, एस.पी. कॉलेजमधला टेरर, ‘डीएसपी.’ ! दिग्या एस. पाटील !! जसं, रामगोपाल वर्माच्या ‘सत्या’ मध्ये ‘सत्या’भोवती कथा फिरते पण ‘धासू रोल’ आहे ‘भिखू म्हात्रे’! सुशिंनी कादंबरीतलं ‘डीएसपी’ हे character ज्या कुणावरून तरी साधारणपणे घेतलं होतं ते शांत आणि मवाळ दिसणारे-बोलणारे गृहस्थ एकेकाळी ‘टेरर’ होते?

अर्थात दुनियादारीत शिव्या, रोमान्स, मारामारी, एस.पी. कॉलेजचा कट्टा, दारू, इतकंच काय श्रेयस, दिग्या, मिनू, रेखा, शिरीन, साई, अश्क्या, एम.के.श्रोत्री वगैरे सगळी फक्त ‘साधनं’ आहेत...कादंबरीचं ’साध्य’ नाही !! आपल्याला मारझोड करणाऱ्याची ओळख सांगताना नित्या म्हणतो “दिग्या त्याला काही करू शकणार नाही. ‘नितीन सदाशिव घोडके’ मधला तो माणूस ‘सदाशिव’ आहे रे !” असं अंगावर येणारं वाक्यं दुनियादारीतच आहे !

ऑर्कुटवर ‘Suhas Shirvakar’ नावाची कम्युनिटी आहेच पण नुकतीच ‘duniyadari’ ही community सापडली! Yes, आपल्या आवडत्या पुस्तकाची दुनियादारी !! मी तर त्या कम्युनिटीतल्या बऱ्याच मेंबर्सना (अजून तरी) ओळखतही नाही. कोण कुठले हे लोक? वेगवेगळ्या वयांचे, ठिकाणांचे, मतांचे आणि विचारांचेही !! पण सगळ्यांच्या मनाच्या एका सुगंधी कोपऱ्यात कुठेतरी ‘दुनियादारी’ कायम आहे.

‘दुनियादारी’नं तुम्हाला ‘बि’घडवलं असेल तर नक्की सांगा कारण आपण-तुपण गाववाले !!!

17 comments:

यशोधरा said...

संदीप, वाक्याचा ‘घेता’ साठी 'उद्गाता' हा शब्द कसा वाटतो? :)
लिहिलेले वाचून इष्टोरी वाचण्यासाठी दिलेली लिंक उघडायचा प्रयत्न केला, पण page not found येतय. आता हे पुस्तक मिळवून वाचायलाच हव. :)

PG said...

Duniyadari chi athwan karoon dilis. Ata parat te sagla wachlya shiwai paryay nahi. To paryant ata dokyat bhunga rahnar....

Shyaa waitag ahe sala ;-))))

Prashant

Tejoo Kiran said...

Sandeep, I agree with Prashant. Gelyach athavadyat kunashitari Shobha Chitre's "Gothalelya Vaaata" var charcha zali and after 18-19 years te punha vachayala ghetale. Ata Dunuyadaari chi athavan karun dilis, shodhun thevayala pahije. Babankade nakkich asel. Thanks for the reminder.
--Tejoo.

ओहित म्हणे said...

तसं दुनियादारी खरच काय आहे बघायची ऊत्सुकता वाढली हे वाचून [:)]

Unknown said...

duniyaadari mi kay bolnar ????? jawal paas pustakani 20-25 parayan sahaj zali astil aani jata yeta kiti tari welela vachal asel yachi ganatich nahi......... EVER GREEN pustak

संदीप चित्रे said...

Join the club Dipali :)
malaa sandeepchitre@gmail.com ithe mail paaThavalee tar aapaN "duniyaadaaree" pustakaabaddal ajoon jaast gappaa karoo.

Anonymous said...

संदीपभाऊ,
सुंदर लिहिलंयस.
दुनियादारी म्हणजे दुनियादारीच...यासम केवळ हाच असं काहीसं.

नित्याचं ते वाक्य माझं फेव्हरिट होतं..कित्येकदा मी ते मित्रांमध्ये वापरलंय...परिस्थितीनुरुप :)

- ध मा ल.

Unknown said...

mast lihIlays.. pan mi ajun duniyadari vachla nahi.. :( ebook vagere kahi ahe ka kuthe? ithe milna avghad ahe pustak..

Anonymous said...

मस्तच आहे दुनियादारी
खरच प्रत्येकाने वाचावी अशी :)
आणि अगदी सहज लिहिलेय अशी वाटते.उगाच ओढलेय अशी नाही वाटत .....
--ऋचा

देवदत्त said...

सुंदर पुस्तक.
साधारण २००२/३ मध्ये अल्फा मराठीवर ही मालिका पाहिली होती ती मला खूप आवडली होती. त्याचा शेवट नव्हता आवडला.

खरं तर ह्या पुस्तकाबद्दल मला माहितच नव्हते. गेल्या वर्षी कळले की सुहास शिरवळकरांच्या पुस्तकावर ती मालिका बनविली होती. मग लगेच पुस्तक घेऊन आलो. वाचता वाचता मालिकेतील कलाकारच समोर दिसत होते. पण बहुधा मालिकेशी सांगड घालत असेन, म्हणून सुरूवातीला तेवढी मजा नाही आली. मग त्या पुस्तकाने पकड घ्यायला सुरूवात केली. वाचून संपले तेव्हा भारावून गेलो. आता गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा वाचून काढले.

आणि काय लिहावे सुचत नाही....

Bhagyashree said...

attach vachun sampli barka duniyadari!
ajun bharavleli ahe...

tujhyamule kalale he nav, mhanun mhantla thanks pochvavet! :D

संदीप चित्रे said...

You are most welcome, Bhagyashree :)

Doorie....!!! said...

mama, mi rohit... punyach aahe... duniyadari... fakt nav jari ghetala na sagalipatra doly samr yetat... vatat ki mi aata shreyas, shirin, meenu, dsp, rekha hyanchya barobar lonavalyat aahe... really grt yaar... mi aata paryant 34 vela vachali aahe duniyadari... mazi duniyadari chi 3 pustake chorila geli(chori karnaryach hi duniyadari var khup prem aasala pahije), mi parat 4th time navi vikat ghetali. sadhya mala vachaychi khup echha hot aahe... but no use, sadhya mi hydrabaad la aahe aani duniyadari punyat mazya GF(lol) kade aahe... khup echha hot aahe... aik na sandeep mama, jar kharach tuzya kade duniyadari chi e-book copy aasel.. tar nakki de.... mi vat pahatoy.... Rohit Katkar

संदीप चित्रे said...

रोहितमामा !
माझ्याकडे दुनियादारीची eCopy नाहीये यार.
In fact माझ्या माहितीप्रमाणे दुनियादारीची eCopy कुठेच नाहीये !!

Doorie....!!! said...

actually, tumcha photo pahun tumhala mama mhanala.. tasa tumcha mama karaych maza kai plan navchata...[:P][:P][:P]

So kase aahat aapan?? kai chalalai??? keep in touch....

Unknown said...

pls mala duniyadari e-book kuthe milel te sanga?

संदीप चित्रे said...

@Priyanka: माझ्या माहितीप्रमाणे तरी ’दुनियादारी’चे e-book नाहीये !