Thursday, March 13, 2014

बासरीचा सूर

बासरीला सूर यावा लागतो
फुंक नाही श्वास द्यावा लागतो … 1


कैक दिव्ये पार पाडो देवकी
पण युगंधर वाचवावा लागतो …. 2


गायकाचा रंगण्याला मारवा
रिषभ कोमल आत व्हावा लागतो …. 3


झाड होण्या बीजही सैलावते
ऊन, पाणी, वेळ खावा लागतो …. 4


ऐनवेळी ते विकाया लागते
भाव स्वप्नाचा मिळावा लागतो …. 5


पंख नुसते काय कामाचे, खगा?
ध्यास गगनाचा असावा लागतो …. 6


कर्मकांडे लाख केली, विठ्ठला!
मुक्त होण्या जीव जावा लागतो …. 7

 

 
 

 

 

4 comments:

Jayashree Ambaskar said...

संदीप...सुरेख जमलीये रे !!

गायकाचा रंगण्याला मारवा
रिषभ कोमल आत व्हावा लागतो....अहाहा !!

पंख नुसते काय कामाचे, खगा?
ध्यास गगनाचा असावा लागतो … मस्तच !!

लिखते रहो दोस्त :)

Namratta said...

Lovely Sandeep...

अमोल केळकर said...

Sunder ......

Priya Tembhekar said...

फारच सुंदर लिहिले आहेस.