Saturday, November 17, 2007

दूर आहे ‘डेडलाईन’ अजूनि !

(चाल: तरूण आहे रात्र अजूनि)


दूर आहे ‘डेडलाईन’ अजूनि, साहेबा पेटलास का रे....
एवढ्यातच मानगुटीवर, तू असा बसलास का रे....

अजूनही सुकल्या न कागदी, रिक्वायरमेंटच्या ओळी
अजून मी लिहले कुठे रे, हाय तू रूसलास का रे….

सांग या शेजारच्या चटक चांदणीला काय सांगू
तिला पहाया जमती सारे, आणि तू बसलास का रे…

बघ तुला मिळतोच आहे, पश्चिमेचा मार गोरा
रूपया नि डॉलरमधला फरक तू लुटलास का रे…

उसळती पीसीवर ह्या, क्रिकेटच्या स्कोअर लाटा
तू भुतासारखा पण एकटा डोकावलास का रे…

डोळे अजूनि बंद का रे, श्वास ही मग मंद का रे
बोल रिक्रुटरच्या थापेवर, तू असा फसलास का रे…

8 comments:

A woman from India said...

:D

A woman from India said...

:D

सर्किट said...

हा..हा..हा..:) हहपुवा! लोल! मस्तच रे. "रिक्रुटरच्या थापांना भुललास का रे" तर अगदी जबरदस्तच! आता फ़क्त सुरात गाऊन त्याची एम.पी.थ्री. लोड करून दे, म्हणजे धम्माल होईल! :)

HAREKRISHNAJI said...

झक्कास. That reminds me I have already overcrossed deadline. must send reports tomorrow.

यशोधरा said...

khee, khee... :)

Tejoo Kiran said...

Very Nice !!! Specially last two lines .... ;-)

Tejoo.

संदीप चित्रे said...

Sangeetgod, Harekrishnaji, Yashodhara and Tejoo:
Thanks for the compliments 
Cheers.

Anonymous said...

मस्तच आहे दुनियादारी!!
खरच प्रत्येकाने वाचावी अशी :)
आणि अगदी सहज लिहिलेय अशी वाटते.उगाच ओढलेय अशी नाही वाटत .....

--ऋचा