आयुष्य हे छोट्या छोट्या क्षणांचं बनलेलं असतं आणि काही क्षण खास असतात. दहा वर्षांपूर्वी मोठ्या चिरंजीवाबरोबर बसून एक चित्र काढलं होतं. त्याबद्दलचा लेख 'चित्रकलेचा दोर' इथे लिहिला होता. त्यावेळी मोठा मुलगा आदित्य ५ वर्षांचा होता.
आता धाकटा आयुष ६ वर्षांचा आहे. नुकतंच एकदा त्याच्याबरोबर चित्रकलेसाठी बसलो होतो! फरक इतका आहे की त्यावेळी मी आणि मोठ्या मुलाने मिळून चित्र काढलं होतं आणि ह्यावेळी धाकट्या मुलाने चित्र काढलं तर मी बाजूला बसलो होतो.
तर, झालं असं की सध्या कोविडमुळे सगळे घरी अडकले आहोत आणि काही ना काही प्रकारे साकारात्मक काम करत राहायचा आपण सगळेच प्रयत्न करतोय. ब्रूक मेयर ह्या माझ्या एका सहकाऱ्याने एक विडीयो सीरिज सुरु केली ज्याद्वारे तो प्रत्येक भागात वेगळी वेगळी चित्रं काढण्याच्या सूचना टप्याटप्याने देतो. शार्क, व्हेलं , ड्रॅगन असे वेगवेगळे आकार तो एकेका भागात दाखवतो. त्यापैकी शार्क कसा काढायचा ते पाहून आयुषने काढलेलं हे चित्रं . ब्रूक स्वतः युजर एक्सपिरियन्स डिझायनर आहे त्यामुळे तो अगदी साधे सोपे आकार काढत चित्र पूर्ण कसं करायचं ते दाखवतो.
तो पेश है वो चित्र जिसे बने बस कुछ दिन हुए हैं! आमच्या चिरंजीवांनी चित्र तर काढलंच आणि ते रंगवलंही. रंगवणं आणि कासव काढणं ह्या दोन्ही गोष्टी मूळ चित्रात नाहीत जे चिरंजीवांनी आपल्या मनाने केलं.
1 comment:
खूप छान माहिती आणि चित्र आहे.आमच्या ब्लॉग ला नक्की भेट द्या...
JIo Marathi
Post a Comment